LoC वर घुसखोरी करणार्‍या 3 दहशतवाद्यांचा खात्मा !

जम्मू-काश्मीर : पोलीसनामा ऑनलाइन –  भारत-पाक सीमेवरती असणाऱ्या नौशेरा सेक्टरमध्ये काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा हा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. यावेळी, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दहशतवाद्यांकडून काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत होते. त्यावेळी भारतीय सुरक्षा दलाने या तीन दहशतवाद्यांना ठार केलं असून, सुरक्षा दलाकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. हे दहशतवादी पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने सतत भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून, भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहे.

दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात हिज्बुल कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला होता. तेव्हापासून दहशतवादी घाबरले असून, हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण, दहशतवाद्यांचा हा प्रयत्न सुरक्षा दलाचे जवान हाणून पाडत असल्याचं दिसतं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like