सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्याचा खात्मा

कुपवाडा (जम्मू-काश्मीर ) : वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांनाचा खात्मा करण्यात यश आले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.


कुपवाडा परिसरात सुरक्षा दलांना दहशतवादी लपून बसल्‍याची माहिती काल रात्री सुरक्षा दलाला मिळाली. मिळालेल्‍या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरु करण्यात आली. चहुबाजूंनी दहशतवाद्यांना घेरण्यात आले. जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं. मात्र दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्‍युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्यात आला. ही चकमक तात्पुरती थांबली असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे

पुलवामा हल्ल्यानंतर सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी सैन्याने दोन दिवसांत ३० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.