महिला ISI एजंटनं FB ‘चॅट’ करून भारतीय जवानाला जाळ्यात ओढलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने भारतीय जवानाला फसवून गुप्त माहिती मिळवल्याची घटना समोर आली आहे. या जवानाला फसवून त्याच्याकडून भारतीय लष्कराची महत्वाची आणि गोपनीय माहिती चोरी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भारतीय सैनिक विचित्र बहरा याला अटक केली आहे. याआधी देखील अनेकवेळा त्याच्यावर शंका व्यक्त करण्यात आली होती.

ISI की एजेंट ने FB चैट से भारतीय सेना के जवान को फंसाया

मिळालेल्या माहितीनुसार, विचित्र बहरा याच्या संदिग्ध हालचालींमुळे त्याच्यावर शंका आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर नजर ठेवण्यात आली असता भारतीय गुप्तचर यंत्रणांना महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली.

ISI की एजेंट ने FB चैट से भारतीय सेना के जवान को फंसाया

यामध्ये समोर आले कि, पाकिस्तानी महिला एजंट त्याच्याबरोबर फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात होती. त्यानुसार ती सर्व महत्वाची आणि गोपनीय माहिती त्याच्याकडून काढून घेत असे. त्याबदल्यात भारतीय जवान तिच्याकडून पैसे देखील घेत असे. दोन वर्षांपासून हा जवान या महिला एजंटच्या संपर्कात असून त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.

ISI की एजेंट ने FB चैट से भारतीय सेना के जवान को फंसाया

दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले असून भारतीय सैन्याच्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली आहे. तसेच अधिक तपास सुरु असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

Visit : Policenama.com