पत्नीचा छळ पडला महाग ; सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला अटक 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत असलेल्या प्रशांत मोरे या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला पत्नीचा छळ केल्याने डोंबिवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २०१५ ला कॅप्टन  प्रशांत मोरे यांचं डोबिवलीतील रहिवासी स्नेहा मोरे यांच्याशी विवाह झाला होता.

भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत असलेले प्रशांत मोर यांचे २०१५ ला डोबिवलीतील रहिवासी स्नेहा मोरे यांच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्या नंतर काही काळ सौंसर चांगला चालला मात्र काही काळा नंतर टॉघांमध्ये वाद होऊ लागले, त्यावेळी सतत काही ना काही कारणावरून ते आपला छळ करत होते, तसेच आपले अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी देत होते, असा आरोप पत्नी स्नेहा मोरे यांनी केला आहे. याबाबत डोंबिवलीच्या रामनगर पोलिस चौकीत गुन्हा नोंद झाला केला आहे.

विशेष म्हणजे  प्रशांत मोरे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी जमीन अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान रामनगर पोलिसांनी प्रशांत मोरे यांना पुण्याच्या सैन्यतळावरून ताब्यात घेतले. दरम्यान कॅप्टन  प्रशांत मोरे यांची आतापर्यंत जिथे जिथे पोस्टिंग झाली, त्या ठिकाणाहून माहिती घेतली असता अनेक महिलांना नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यतात आला.

या सगळ्याबाबत स्नेहा मोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या  पतीचे दुष्कृत्य समोर आणायचे होते म्हणून हे पाऊल उचलले होत. इतकेच नव्हे तर भारतीय सैन्याचे नाव खराब खराब करायचे नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us