पुण्यामध्ये लष्करी अधिकाऱ्याचा ‘गोळीबार’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामाच्या वादातून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला तीन अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. सुरक्षारक्षकाला वाचवण्यासाठी सोसायटीत राहणारे लष्करी अधिकारी मारहाण करणाऱ्यांना समजून सांगत होते. मात्र, ते तिघे ऐकत नसल्याचे पाहून लष्करी अधिकाऱ्याने आपल्या पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला. हा प्रकार उंड्री येथील कडनगर येथील उच्चभ्रु ओव्हीओ लश लाईफ सोसायटीत घडला.

मोहंमद मैनुल्ला शहिदअली सिद्धीकी (वय-26 रा. कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धीकी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्य़ादेवरून कोंढवा पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्यासोबत काम करणऱ्या इतर सहकाऱ्यांबरोबर काम करण्याच्या कारणावरून वाद झाले होते.
सिद्धीकी हे रविवारी रात्री सोसायटीच्या गेटजवळ पहारा देत असाताना दोघांसह एक साथीदार त्या ठिकाणी आला. त्यांनी सिद्धीकी यांना लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी सोसायटीत राहणारे लष्करी अधिकारी सिद्धीकी यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना समजावून सांगत होते. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने लष्करी अधिकाऱ्याने त्यांच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने सोसायटीत खळबळ उडाली. गोळीबार केल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच.सी. शिंदे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –