चीनकडून वाढतोय धोका, पूर्वोत्तर राज्यांतून सैनिक हटवून LAC वर 10 हजार जवान तैनात करणार लष्कर

नवी दिल्ली : मागील काही वर्षात पूर्वोत्तर भारतात सुरक्षेची स्थिती सुधारली आहे आणि आता भारतीय लष्कराने आपल्या सुमारे 10 हजार जवानांना येथून हटवून त्यांचा प्रमुख उद्देश म्हणजे पूर्व सीमेवर चीनकडून वाढत असलेल्या धोक्याला तोंड देण्याचे काम सोपवणार आहे. हे जवान रिझर्व्ह डिव्हिजनचा भाग असतील ज्यांना सहजपणे कधीही एलएसीवर सुरक्षेसाठी असलेल्या फ्रंट लाइन सैनिकांच्या मदतीसाठी पाठवले जाऊ शकते किंवा संवेदनशील परिसरात एखाद्या आकस्मिक स्थितीला तोंड देण्यासाठी पाठवले जाऊ शकते.

सूत्रांनुसार, अजूनपर्यंत 3 हजार सैनिकांना पूर्वोत्तर राज्यांची आंतरिक सुरक्षा आणि दहशतवादविरोधी ड्यूटीवरून हटवले गेले आहे, अन्य 7 हजार सैनिकांना याच वर्षी हटवले जाईल.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या पावलामुळे सीमांवर लक्ष केंद्रीत करणे आणि पारंपरिक अभियानांसाठी जवानांना प्रशिक्षित करण्यात मदत होईल.

अनेक संसदीय समित्यांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या की, दहशतवादविरोधी अभियानात सैनिकांची संख्या कमी केली जावी कारण याच्या परिणामामुळे लष्कर आपले सर्वात मोठे काम म्हणजे देशाला परकीय आक्रमणापासून वाचवण्यावर लक्ष केंद्रीत करू शकते.

12 जानेवारीला लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सुद्धा म्हटले होते की, लष्कर पूर्वोत्तर भारतात आपली संख्या कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे, जेणेकरून परकीय धोक्याला तोंड देण्यावर लक्ष केंद्रीत करता येईल.

पूर्व नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल डीएस हुडा (रिटायर्ड) यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी अभियानामधून सैनिकांची संख्या कमी करणे एक चांगले पाऊल आहे.