आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या 8000 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांची 8 हजार जागांवर भरती केली जाणार आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक ही पदे भरली जाणार असून त्यासाठी संबंधित विषयात 50 टक्क्यांपर्यंत पदव्युत्तर शिक्षण, पदवी आणि बीएडची पदवी आवश्यक आहे.

वेबसाईट – http://aps-csb.in/College/Index_New.aspx

शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षकासाठी संबंधित विषयात 50 टक्क्यांपर्यंत पदवी, बीएड किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.
पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदांसाठी संबंधित विषयात 50 टक्क्यांपर्यंत पदव्युत्तर शिक्षण, पदवी आणि बीएडची पदवी आवश्यक आहे.

अर्ज करण्याची मुदत
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 सप्टेंबर 2019

वयोमर्यादा
1 एप्रिल 2020 रोजी फ्रेशर्ससाठी 40 वर्षापेक्षा जास्त नसावे तर अनुभवी उमेदवाराचं वय 57 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क
अर्जाची फी 500 रुपये आहे.

परीक्षेची तारीख
19 आणि 20 ऑक्टोबर रोजी स्क्रीनिंग परीक्षा होईल.

Loading...
You might also like