Pune News : आर्मी पेपर लीक प्रकरण : 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कराच्या गुप्त माहितीवरून विश्रांतवाडीत छापे टाकून लष्कर भरतीचा लेखी पेपर देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी मोठी कारवाई केली असून, यात दोन लष्कर कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना पकडले आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या करवाईनेच लष्कर परीक्षा रद्द केली होती.

किशोर महादेव गिरी (वय 40, रा. लकडे नगर, माळेगाव, बारामती) कुमार परदेशी (रा. फलटण जिल्हा सातारा), योगेश उर्फ गोट्या शंकर गोसावी (रा.माळेगाव, बारामती) आणि भरत ( पूर्ण नाव माहीत नाही) अशी चौघाची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात रिलेशन आर्मी भरती परीक्षा होणार होती. अनेक तरुण यात सहभागी झाले होते.

दरम्यान गिरी हा एक प्रशिक्षण अकादमी चालवतो. तर यात दोघे लष्कर कर्मचारी आहेत. या दोघांनी ओळखीचे मुले जमवत त्यांना लष्करचा होणारा पेपर देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी मुले जमवली होती. पण, ही माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार लष्कराचा गुप्त विभाग व गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान विश्रांतवाडी येथे पकडलेले रॅकेट आणि वानवडीतील रॅकेटचा संबंध असल्याची माहिती आहे. आता त्याचा तपास केला जात आहे.