Army Recruitment Scam | …म्हणून त्याची मूळ शैक्षणिक व अन्य कागदपत्रे घेतली ताब्यात; लष्कर भरती पेपर फुटीप्रकरणातील आरोपींचा प्रताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Army Recruitment Scam | लष्कर भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात (Army Recruitment Scam) आरोपींनी पास झालेल्या उमेदरावांनी पैसै द्यावे म्हणून त्याची मूळ शैक्षणिक व अन्य कागदपत्रे ताब्यात घ्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून ती कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयाने या गुन्ह्यातील तिघांचा जणांचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपींमध्ये दोन माजी सैनिकांसह एका स्वयंपाक्याचा समावेश आहे. महेंद्र चंद्रभान सोनवणे (वय 37, रा. दिघी. मुळ रा. अहमदनगर), अलीअख्तर अब्दुलअली खान (वय 47), आजाद लालमहमंद खान (वय 37, रा. गणेशनगर, बोपखेल. मुळ रा. गाझीपुर, राज्य. उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहे. आरोपींसह त्यांच्या अन्य एका साथीदारांला सैन्याची भरती परिक्षा या कार्यपध्दतीबाबत माहिती असून त्यांकडून पश्चिम महाराष्ट्रात रिक्रुटमेंट अकादमी चालविण्यात येत आहे. तर, काहींना त्यांनी फ्रँचायजी दिलेल्या आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी आरोपींनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Lawyer Premkumar Agarwal) यांनी विरोध केला. जप्त करण्यात आलेले पेपर व परीक्षेचा पेपर एकमेकांशी जुळत असल्याचा अभिप्राय लष्कराकडून प्राप्त झाला आहे. आरोपींनी अन्य आरोपींशी संगनमत करून कट कारस्थान रचून लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी हातमिळवणी करून भरती परिक्षेचा पेपर परिक्षेच्या आदल्या रात्री फोडून तो पेपर एकमेकांना व उमेदवारांना पाठविला.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

या गुन्ह्यात मेजर किशोर गिरी (वय 40, रा. बारामती), भारत अडकमोळ (वय 37, रा. जळगाव), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय 47, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू), वसंत किलारी (वय 45) यांविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. त्यापार्श्वभूमीवर चौघांना तांत्रिकदृष्टया जामीन मंजुर केला आहे. वानवडीच्या गुन्ह्यात त्यांचा जामीन नामंजुर झाल्यामुळे सध्या चौघांचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (acp laxman borate) व पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (psi sanjay gaikwad) यांनी करत आहे.

Web Title : Army Recruitment Scam | … so his original academic and other documents were taken into custody; Pratap of the accused in the army recruitment paper split case