राष्ट्रपती भवनामध्ये लष्करी जवानानं बराकीत फाशी घेवून केली आत्महत्या, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती भवनात आज पहाटे लष्कराच्या जवानाने बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या जवानाचा मृतदेह बॅरेकमध्ये पंख्यावर लटकलेला आढळला आहे. तेज बहादुर थापा असे या जवानाचे नाव आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानाचा मृतदेह आर्मी बेस रुग्णालयात नेण्यात आला आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. सध्या पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

असे सांगितले जात आहे की, दिल्लीतील पीएस साऊथ ऍव्हेन्यू येथे पोलिस पीसीआरला सकाळी ४ वाजता राष्ट्रपती भवनात सैन्याच्या जवानाने फाशी घेतल्याची माहिती मिळाली होती. चौकशीत असे आढळले आहे की, ३८ वर्षीय सैनिक तेज बहादुर थापाने राष्ट्रपती भवनात बॅरेक-सी येथे एका पंख्याला फाशी घेतली होती. त्याच्याकडे कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

जवानाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. मात्र जवानाने कोणत्या कारणास्तव गळफास लावून आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.