Army Truck Crashed | लष्कराचा ट्रक ६०० फूट खोल दरीत कोसळला; तीन जवान शहीद तर तीन जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama Online) : जवानांना घेवून जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकचा (army truck) पूर्व सिक्कीममध्ये (East Sikkim) मोठा अपघात (Accident) झाला आहे. हा ट्रक ६०० फूट दरीत कोसळला (Army Truck Crashed) असून या दुर्घटनेत तीन जवान शहीद (Three soldiers killed) झाले आहे तर तीन जखमी झाले आहेत. ही दुर्घटना न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर (New Jawaharlal Nehru Road) घडली आहे. हा मार्ग गंगटोकला (Gangtok) भारत-चीन सीमेजवळील (India-China border) सोमगो लेक आणि नाथुलाला जोडत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. army truck crashed into a deep ravine three killed and three injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रकमध्ये कुमाऊं रेजिमेंटेचे सहा जवान होते.
गंगटोकच्या (Gangtok) दिशेने हा ट्रक जात होता.
त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली.
वाहनचालकासह दोन जवान शहीद झाले.
तर इतर तीन जवान जखमी आहेत.
या दुर्गम क्षेत्रात सेना, बीआरओ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून बचाव अभियान राबविले आणि तीन जखमी सैनिकांना गंगटोकच्या आर्मी रुग्णालयात दाखल केलं आहे.
त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title : army truck crashed into a deep ravine three killed and three injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gulshan Kumar Murder Case | गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात हायकोर्टाचा 24 वर्षानंतर मोठा निर्णय