अर्णब गोस्वामींना अंतरिम दिलासा नाही ! जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. उद्या दुपारी 3 वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळं असं म्हणावं लागेल की, सध्या तरी अर्णब यांना अंतरिम दिलासा नाहीच.

अर्णब यांना रायगड पोलिसांनी अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर अर्णब यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अर्णब यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी सेशन कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर अर्णब यांना अखेर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळं उद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुबंई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अर्णब यांच्या अटक प्रकरणाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे –
सकाळी 7 वाजता : मुंबई आणि रायगड पोलीस अर्णब यांच्या घरी दाखल झाले.
सकाळी 8.15 वाजता : अर्णब गोस्वामींना मुंबई आणि रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सकाळी 11.30 वाजता : पोलीस बंदोबस्तात अर्णब यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
दुपारी 12.14 वाजता : अलिबाग पोलीस ठाण्यातच आरोग्य तपासणी करण्यात आली.
दुपारी 1 वाजता : अर्णब न्यायालयात हजर, मारहाण केल्याचा आरोप
सायंकाळी 5 वाजता : पुन्हा आरोग्य चाचणी करत न्यायालयात हजर