जेलमध्ये जाण्यासाठी हा पुरावा पुरेसा..! अर्णब गोस्वामीच्या WhatsApp चॅटवरून, प्रशांत भूषण यांनी केलं Twit

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वकील प्रशांत भूषण यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे एक जुने व्हॉट्सॲप चॅट पसरले आहे. त्यावरून प्रशांत भूषण यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर आरोप केले आहेत. हे आरोप त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केलेले आहेत. व्हॉट्सॲप चॅट शेअर करत हे चॅट अर्णब गोस्वामी आणि रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ यांच्यामध्ये झालेली ही बातचीत आहे. असे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट ही शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहले आहे कि, बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे पसरलेले फोटो आहेत. या फोटोंवरून अर्णब गोस्वामी यांच्या काटकारस्थानाचा पोल खोल होते. त्यांनी पुढे असे लिहिले आहे की, याबरोबर असंही उघड होतं , कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत. असे त्यांनी म्हटलं.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे सीईओ यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट, आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ट्विटर युजर्स अर्णब गोस्वामी हॅशटॅगसह त्यांचे जुने चॅट शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रशांत भूषण यांच्या याच ट्वीटवर कमेंट करताना पत्रकार मीना दास नारायण यांनी लिहिले आहे की, …आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू ? एक कारण सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवर परवेज खान या युजरने या ब्रेकींग न्यूजला कोणतंही मीडियावाले का कव्हर करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे.