कर्नाटक संदर्भात सुप्रीम कोर्टात आज ‘फैसला’, कुमारस्वामी सरकारच्या भविष्यावर थेट ‘इम्पॅट’

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याच्या प्रकरणात आज दिनांक १७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात निकाल देण्यात येईल. न्यायालय ठरवेल की विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय पहिल्यांदा घेता येईल की आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय. गुरुवारी होणाऱ्या सरकारच्या बहुमत परीक्षेवर याचा थेट परिणाम होईल. आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेल्यास कुमारस्वामी यांचे सरकार पडू शकते. आमदारांचा राजीनामा स्वीकारला न गेल्यास त्या आमदारांना पक्षाने काढलेल्या आदेशानुसार सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल.

विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या काँग्रेस जेडीएसच्या १५ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की विधानसभा अध्यक्ष आपल्या संवैधानिक जबाबदारीपासून लांब पळत आहेत. ते राजीनाम्यावर निर्णय घेत नाहीत. उलट आमदारांचे सदस्यत्व अयोग्य असल्याची कारवाई त्यांनी सुरु केली आहे. बहुमत गमावलेल्या सरकारला वाचवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत.

गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश राजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांना भेटून राजीनाम्यावर निर्णय घेण्यास सांगितले होते. आमदारांच्या वकिलांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष आमदारांना भेटले पण राजीनाम्यावर कोणताच निर्णय नाही घेतला.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने