जम्मू-काश्मीरमधील 70 ‘दहशतवादी’ आणि ‘फुटीरतावादी’ आग्रा येथे ‘शिफ्ट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मिर मधील कलम ३७० हटविल्यानंतर सुरक्षेची खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मिरमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यातच जम्मू काश्मिरमधील कारागृहात असलेले ७० दहशतवादी आणि पाक समर्थन करणाऱ्या फुटीरवाद्यांना हवाई दलाच्या विशेष विमानेने आग्रा येथील करागृहात हलविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

३७० कलम हटवल्यानंतर राज्यातून तब्बल ४०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ३७० कलम हटवल्यानंतर राज्यात सर्वत्र सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील तेथे हजर आहेत. त्यानंतर आता सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरमधील ७० दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना आग्र्यातील कारागृहात हवाई दलाच्या विशेष विमानाने शिफ्ट करण्यात आले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त