अबब …! बैलाच्या पोटातून काढले चक्क ८५ किलो प्लास्टिक

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रात प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी असली तरी प्लास्टिक बॅगचा वापर सर्रास होताना दिसतो आहे. प्लास्टिक बॅग तशाच रस्त्यावर टाकलेल्या दिसतात. आणि मग भटक्या जनावरांकडून या प्लास्टिक बॅग खाल्ल्या जातात मागील महिन्यात पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून आणलेल्या बैलाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क ८५ किलो प्लास्टिक काढले गेले आहे. या बैलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असले तरी , संकट अद्याप संपलेले नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

बीफवर बंदी आणल्यापासून मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. शेतकऱयांकडून उपयोगात येत नसलेली जनावरे मोकाट सोडली जातात त्यांच्याकडे कुणीही पाहत नाही.

पोटातून निघाले बरेच काही

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या बैलाच्या पोटातून प्लास्टिक शिवाय धातूचे तुकडे,खिळे ,स्क्रू आणि काच देखील सापडली आहे. पशन केलेल्या बैलाची तळमळ पाहून काही स्वयंसेवकांनी या बेलाला जनावरांच्या डॉक्टरांकडे नेले. तब्बल आडीच तासांच्या ऑपेरेशन नंतर बैलाच्या पोटातून ८५ किलो प्लास्टिक आणि इतर गोष्टी काढल्या . या बैलाच्या पोटात एवढ्या मोट्या प्रमाणात प्लास्टिक सापडल्यामुळे गेल्या ६-७ वर्षांपासून बैलाने प्लास्टिक खाल्ले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.