Pimpri : थेट खिशात लाच स्वीकारणारी महिला वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित (व्हिडीओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने वेगळ्या पद्धतीने लाच (Bribe) स्विकारल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेचे गाभीर्य ओळखून पिंपरी चिचंवड पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी करुन तिच्यावर निलंबनाची (Suspend) कारवाई केली. संबंधीत वाहतूक महिला कर्मचाऱ्याने (Traffic Women Police) थेट खिशात पैसे घेत लाच (pocket bribe) स्विकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरुन ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले.

स्वाती सोन्नर असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. पिंपरी येथील साई चौकात मंगळवारी (दि.15) त्या वाहतूक नियमनाचे काम करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन महिलांना थांबवले. त्यावेळी काही जाणांनी या घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करुन याची क्लिप सोशल मीडियावर व्हयरल केली.

नेमके काय घडलं

पिंपरीतील शगुन चौकातून स्कूटरवरून विना हेल्मेट जाणाऱ्या एका तरुणीला महिला वाहतूक पोलिस कर्मचारी सोन्नर यांनी रोखले होते. त्यांच्याकडे रितसर चौकशी करण्यात आली आणि दंडही सांगण्यात आला. या तरुणीने हेल्मेट न घातल्यामुळे महिला वाहतूक पोलिस सिन्नर यांनी कारवाई केली होती. पण, पावती न फाडता ‘काही तरी घ्या’ असं म्हणून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न तरुणीने केला. तरुणीने वाहतूक पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हो नाही म्हणत सिन्नर यांनी लाचेची रक्कम पॅन्टच्या खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने पैसे थेट पॅन्टच्या मागील खिशात ठेवून ती निघून गेली.

महिला वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यावेळी साई चौक येथे वाहतूक नियमन करीत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.