Coronavirus : ‘कोरोना’मुळं जगभरातील 24000 हून अधिक जणांचा मृत्यू, एकटया इटलीमध्ये 8215 लोकांचे गेले प्राण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोनाने दहशत पसरवली आहे. यामुळे आता कोरोनाग्रस्तांंची संख्या देखील वाढत आहे आणि मृतांची देखील. या घातक व्हायरसमुळे आतापर्यंत 24,000 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची आकडेवारी देणाऱ्या वेबसाइट वार्डोमीटर नुसार कोरोनामुळे 24,090 जण मृत्यूमुखी पडल्याचे कळते आहे. आतापर्यंत 532,363 लोक पॉझिटिव्ह आहेत,ज्यातील 19,635 लोक गंभीर स्थितीत आहेत. तर उपचारानंतर आतापर्यंत 124,349 लोक कोरोना व्हायरसमधून बाहेर पडले आहेत.

जगात कोरोनामुळे मृतांची संख्या इटली आणि स्पेनमध्ये सर्वाधिक आहे. इटलीत 8,125 लोकांचा तर स्पेनमध्ये 4,365 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कोरोनामुळे सर्वात आधी प्रभावित झालेल्या चीनमध्ये 3,292 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 1300 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोनाचे नवे घर बनले अमेरिका –

चीन युरोपनंतर आता अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे, अमेरिकेत कोरोनाने घरोबा केला आहे. यामुळे मागील एका दिवसात 17 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित समोर आले. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 85,594 झाली आहे. चीनला देखील अमेरिकेने मागे सोडले आहे. चीनमध्ये कोरोनाचे 81,340 पॉझिटिव्ह आहेत. अमेरिकेत 1,300 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे तर इटतील आतापर्यंत 8215 लोकांचा मृत्यू झाला आहे.