सलमान खानच्या बहिणापासून ते मलायकापर्यंत, ‘या’ अभिनेत्रींसोबत होते अर्जुन कपूरचे ‘अफेअर’

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या सगळीकडे आहे. असे समजले आहे की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. दोघे भलेही रिलेशनला ऑफीशियल सांगण्याचे टाळत असेल तरी दोघांचे स्पेशल बॉन्डिंग त्यांच्या नात्यातील सगळे गुपीत खोलून टाकते पण अर्जुनच्या भूतकाळाविषयी बोलायचे झाले तर सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याचा स्विकार स्वतः अर्जुनने केला होता. सध्या त्याचे नाव अभिनेत्री मलायकासोबत जोडले गेले आहे पण अर्जुनच्या लव लाईफमध्ये अनेक अभिनेत्रींचे नाव जोडले गेले आहे.

२०१४ मध्ये एका मुलाखतीच्या दरम्यान अर्जुनने सांगितले होते की, आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिले अर्पितासोबत रिलेशनशिप होते. त्याचे पहिले आणि खरे प्रेम अर्पिता होती. अर्जुन म्हणाला की, ‘माझे पहिले आणि आत्तापर्यंत सीरियस रिलेशनशिप अर्पितासोबत होते. जेव्हा मी १८ वर्षाचा होतो तेव्हा आम्ही एकमेकांना पहायचो. असे दोन वर्ष घडले. अर्पिताने तिच्याकडून आमच्या रिलेशनशिपचा शेवट केला.’

अर्जुन कपूरचे नाव अभिनेत्री अनुष्का शर्मा हीच्यासोबतही जोडले गेले होते. करण जौहरच्या ‘कॉपी विथ करण’ शोमध्ये अर्जुनने एका प्रश्नावर उत्तर दिले की, त्याला अनुष्कासोबत लग्न करायचे होते. या दोघांची चर्चा जास्त काळ नव्हती.

अर्जुनचे नाव अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबतही जोडले गेले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सोनाक्षी आणि अर्जुन खूप काळ एकमेकांना डेट करत होते. काही काळानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. अर्जुन सोनाक्षीबद्दल जास्त स्पष्ट बोलला नाही पण इशाऱ्यामध्ये त्याने आपल्या नात्याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अर्जुन कपूरचे नाव आथिया शेट्टीसोबत पण जोडले गेले होते. याबाबतीत अर्जुनने सांगितले होते की, ती माझ्या बहिणीची चांगली मैत्रीण आहे. दोघेही खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतात पण तिचे नाव माझ्यासोबत मिडियाने जोडले याचे मला वाईट वाटले. ती खूप चांगली मुलगी आहे.

अर्जुन भलेही अभिनेत्रींसोबत आपल्या नात्याविषयी स्पष्ट मत सांगत असला तरी जेव्हा मलायका येते तेव्हा अर्जुन कपूर एकदम दबावामध्ये आपल्या नात्याचा स्विकार करतो.

आरोग्यविषयक वृत्त – 

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे