सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महागाई भत्ता ३ टक्के वाढवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला आहे. यानुसार १ जानेवारी २०१९ पासून ते ३० जून २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.

तसेच ३ टक्के वाढ करण्यात आलेला महागाई भत्ता आणि त्या वाढीच्या थकबाकीचीही रक्कम जानेवारी २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.