माथाडीच्या नावाने खंडणी मागणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॉस्पिटलमध्ये एअर कंडीशन बसवण्याचे काम सुरु असताना काम थांबवून जीवे मारण्याची धमकी देत माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माथाडी संघटनेच्या नावाखाली १ लाख ६० हजार रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे.

बाबु वसंत ननावरे (वय-३० रा. लोकसेवा वसाहत, ताडीवाला रोड), गोविंद गायकवाड, गौतम जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाबु ननावरे याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सप्टेंबर २०१८ ते मे २०१९ या कालावधीमध्ये फिर्य़ादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी घेतली आहे. फिर्य़ादी हे ढोले पाटील रोडवरील एका हॉस्पिटलचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी फिर्य़ादी अ‍ॅक्वालिच या कंपनीकडून एअर कंडीशनर बसवण्याचे काम करत होते. त्यावेळी ननावरे, गायकवाड आणि जगदाळे या तिघांनी वेळोवेळी त्या ठिकाणी येऊन काम बंद पाडून माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्य़ादी यांच्या कंपनीच्या गाडीतून एसी उतरवण्याचे काम न करताही या तिघांनी त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले.

फिर्य़ादी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बाबू ननावरे याला अटक केली. तर त्याचे इतर दोन साथिदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने करीत आहेत.

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?