अजित पवारांचा ‘कबुल’नामा ! बाळासाहेब ठाकरेंना अटक ही राष्ट्रवादीची चूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्यावेळी आमचंही स्वत:चं मत होतं. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मतला एवढी किंमत नव्हती. त्यावेळी काही जणांच्या हट्टापायी तसे करावे लागल्याची कबुली अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, त्यावेळी आम्ही संबंधित व्यक्तीला वाचारलं की असं का करताय, तेव्हा ते म्हणाले आम्ही विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे निर्णय योग्य वाटतो तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. कुठल्याही पक्षात काम करत असताना पुढे कोणाला संधी द्यायची, हे पक्षाने ठरावयचे असते. व्हिजन असलेल्या व्यक्तीकडेच नेतृत्त्व दिले पाहिजे. राज ठाकरे स्पष्ट बोलतात. पण आजच्या घडीला त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार म्हणले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा पुरेपुर फायदा घेतला आहे.

अजित पवार यांनी मनसेबाबत आपली भूमिका मांडली आहे. आम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) १७५ जागांवर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवू आणि सत्तेत येऊ. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत कुठलाही संबंध नाहीये असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपले उमेदवार मागे घेत एक प्रकारे राज ठाकरेंच्या मनसे उमेदवारांना पाठिंबा दिला असताना आता अजित पवारांनी मनसे सोबत कुठलाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Visit : Policenama.com