देशभरातील राज्यांत दरोडा टाकणारी हायप्रोफाईल टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये महागड्या कारमध्ये सुटाबुटात फिरुन दरोडे टाकणाऱ्या हायप्रोफाईल आंतरराज्यीय टोळीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. अटक करण्यात आलेल्य टोळीकडून पोलिसांनी २० लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5b56660-9bd8-11e8-a642-ed27347ec45e’]

इरुफान इरशद कुरेशी (वय-३८ रा. माजीदपुरा जि. हापुड, उत्तरप्रदेश), इनाम मेहमुद कुरेशी (वय-३६ रा. पुराणाबाजार, मर्कस मश्चिद, जि. हापुर, उत्तरप्रदेश), अस्कीन बसरुदीन मलीक (वय-३५ रा. सिकंदराबाद, जि. बुलंदशहर, उत्तरप्रदेश), इर्शाद अब्दुल रहीम झोजा (वय-४५ रा. गोरखी, सिकंदराबाद, जि. बुलंदशहर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नदीप ऊर्फ बल्ली कुरेशी (रा. हापोडा, उत्तरप्रदेश) हा पळून गेला आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यांमध्ये हुंडाई व्हेरना कंपनीच्या कारमधून सुटाबुटात जावून परिसराची टेहाळणी करायची. त्यानंतर रात्री बंद घराचे कुलुप तोडून घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱी टोळी शिर्डीकडून अहमदनगर शहराच्या दिशेने दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुरी ते राहुरी विद्यापीठकडे जाणाऱ्या रोडवरील शनिशिंगणापुर फाट्यावर सापळा लावला. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या हुंडाई व्हेरना (युपी १६ एके ३८३९) गाडी अडवून आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हुंडाई कंपनीची कार, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर असा ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच १४ लाखांचे ५०० ग्रॅम वजनाचे दागिने, ३० हजार रुपयांचे ७५० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २० लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपींची चोरी करण्याची पद्धत
अटक करण्यात आलेले आरोपी हे सुशिक्षीत, हायप्रोफाईल असून ते हुंडाई व्हेरना या महागड्या गाडीचा गुन्ह्यासाठी वापर करत होते. सुट बुट घालून देशातील विविध राज्यात, शहरात भरदिवसा जावून शहरातील हायप्रोफाईल सोसायटीची टेहाळणी करत. सोसायटीमधील बंगले, बंद फ्लॅट येथे टेहाळणी करुन घरफोड्या, दरोडे टाकत होते.

आधुनिक हत्यारे
टेहाळणी करुन एखादे घर किंवा बंद फ्लॅटचे कुलुप तोडण्यासाठी या टोळीने अधुनिक पद्धतीची कटावणी तयार करुन घेतली होती. या कटावणीच्या सहायाने बंद घराचे किंवा फ्लॅटचे कुलुप तोडून घरात प्रवेश करुन घरातील किंमती सामानावर डल्ला मारत होते.
[amazon_link asins=’B07BSBZ3T6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab5e5f36-9bd8-11e8-b8d3-61acc81bea5f’]

ही कारवाई पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, अहमदनगरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, श्रीरामपुरचे उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, सुधीर पाटील, पोलीस कॉस्टेबल सोन्याबापु नानेकर, विष्णु घोडेचोर, मन्सुर सय्यद, योगेश मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, मनोहर सिताराम गोसावी, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, विजयकुमार वेठेकर, दिपक शिंदे, रवी सोनटक्के, दिनेश मोरे, दत्ता हिंगडे, संदीप घोडके, राहुल सोळुंके, सचिन अडबल, संदीप पवार, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर, देवीदास काळे यांच्या पथकाने केली.