क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरूध्द अटक ‘वॉरंट’, घरगुती हिंसाचाराचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मोहम्मद शमीच्या विरोधात घरगुती हिंसेचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता, त्या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शमीच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले असून त्याला 15 दिवसात आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे.

2018 साली मोहम्मद शमीवर त्यांच्या पत्नीने हसीन जहां हिने मारहाण केल्याचा, बलात्कार केल्याचा, हत्येचा प्रयत्न केल्याचा तसेच घरगुती हिंसा केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर तिने त्यासंबंधित शमीने तिला केलेले मेसेज देखील मिडियासमोर आणले होते. हे गंभीर आरोप शमीने नाकारले होते. परंतू त्यानंतर हसीन जहांं हिने शमीच्या विरोधात केस दाखल केली होती.

सध्या मोहम्मद शमीच्या तलाक संबंधित केस न्यायालयात सुरु आहे. कोलकत्तामध्ये न्यायालयात यांसंबंधित केस सुरु आहे. हसीन जहां हे मिडिया समोर मोहम्मद शमीवर लावलेल्या आरोपांमुळे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर तीने न्यायालयात त्याच्या विरोधात केस दाखल केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –