माजी आमदार गडाख हाजीर हो !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या गुन्ह्यात नेवासे न्यायालयाने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख, माजी आमदार शंकरराव गडाख यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले आहे. त्यांना आज (दि. 16 ) न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिसांना दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलने शंकरराव गडाख हे नेहमी आंदोलन करतात. पाटपाणी, कर्जमाफी, हमीभाव, कांदा, कापूस, दूध दर, बॅकवॉटर, वीज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावरुन त्यांनी नेहमीच आक्रमक आणि निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसून येते. घोडेगाव येथे आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात न्यायालयीन कामकाजात हजर न राहिल्याने प्रकरणे त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले आहे.  त्यामुळे आज सोनई पोलीस ठाण्याच्यावतीने गडाख यांना न्यायालयात हजर केले जाणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.