माजी आमदार गडाखांविरुद्ध अटक वॉरंट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रास्ता रोको आंदोलनाच्या गुन्ह्यात नेवासा येथील न्यायालयाने माजी आमदार शंकराव गडाख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.

गडाख यांच्याविरुद्ध पाटपाण्याचा प्रश्‍न, हमीभाव, पीकविमा, कर्जमाफीचा प्रश्‍न आधी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाबाबत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांची घोडेगाव, वडाळा बहिरोबा, मुळा धरण आदी आंदोलने चांगलीच गाजली. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 341, 143, 149,188 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात नेवासा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

राष्ट्रवादीचा ‘तो’ सदस्य ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार ! 

 

न्याय व्यवस्थेचा मी नेहमी आदर करीत असून, यापुढे न्याय व्यवस्था व कायद्याचे पालन करणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर माझा लढा चालूच होता व यापुढेही लढा चालूच राहणार असल्याचे माजी आ.गडाख यांनी सांगितले.

सख्या भावाने टाकला दरोडा

नगर : राहाता तालुक्यातील बहादराबाद येथे मध्यरात्री अज्ञात टोळीने दरोडा टाकून रोकड व सोन्याचे दागिने असा 95 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. सख्ख्या भावानेच दरोडा टाकण्याची सुपारी दिली असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांना या गुन्ह्यात घरातील व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आला. त्यानुसार तपास केला असताना शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाच्या घरावर दरोडा घातल्याचे निष्पन्न झाले.

यातील मास्टरमाईंड आरोपी बाळासाहेब पाचोरे याचे त्याचा भाऊ सुनिल पाचोरे याच्याशी शेतीचे वाद होते. त्याचा बदला घेण्यासाठी आकाश गायकवाड (राहाता), प्रविण रामनाथ खंडीझोड (कोपरगाव), योगेश कोंडीराम खंडीझोड (कोपरगाव), अक्षय अशोक पारधे ( कोपरगाव) व विरेश सुरेश कोपरे (राहाता) यांना 8 हजार 500 रुपये सुपारी दिल्याचे समोर आले. बाळासाहेब पाचोरे यांनी सुपारी दिल्याने आरोपींनी 21 नोव्हेंबर रोजी सुनिल पाचोरे यांच्या घराशेजारी अपघाताचा बनाव केला व त्यांच्या घराचा दरवाजा वाजवून पाण्याची मागणी केली. दरवाजा उघडताच सुनिल पाचोरे यांच्यासह घरातील व्यक्तींना मारहाण केली व संशय येवू नये म्हणून रोकड व दागिणे चोरून दरोड्याचे रुप दिले.

You might also like