गावठी कट्ट्यासह तरुण अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला सांगवी पोलिसांनी कट्ट्यासह अटक केली आहे. ही कारवाई भैरवनाथ नगर, वैदवस्ती पिंपळे गुरव येथे केली. राहुल संजय सोनकडे (१९, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथ नगरमधील जगताप पेट्रोल पंपाच्या मागे एक तरुण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून राहुल याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा ऐवज मिळून आला.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार कसून चौकशी केली असता त्याबाबात त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.