सांगली : विट्यात तलाठी परीक्षेवेळी डमी उमेदवारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील विटा येथे तलाठी पदाच्या परीक्षेवेळी दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या डमी उमेदवारास अटक करण्यात आली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिरुदेव सुभाष कुलाळ (रा. येळावी ता. जत) व रामहरी शंकर जंगम (रा. कडेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विट्यातील आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी तलाठी पदाच्या परीक्षेचे केंद्र होते. दुपारी अडीच वाजता परीक्षा होती. १ वाजल्यापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरुन प्रत्येक उमेदवाराला ओळखपत्र पाहून सोडण्यात येत होते. सव्वातीनच्या सुमारास बिरुदेव कुलाळ याच्या नावावर डमी उमेदवार बसल्याची शंका पर्यवेक्षकानी उपस्थित केली. त्यानंतर केंद्रचालक अमिर मुलाणी आणि निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी त्या वर्गाची तपासणी केली.

यावेळी सुभाष कुलाळ याच्या नावे रामहरी जंगम परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या ड्रायव्हिंग लायसेन्सवर रामहरी जंगम असे नाव होते. सुभाष कुलाळ त्याचा मित्र असून गेटवर तपासणी केल्यावर परीक्षा केंद्राच्या बाथरुममध्ये कुलाळ आणि जंगम यांनी कागदपत्रांची आदलाबदला करुन संगनमत करुन डमी परीक्षार्थी म्हणून कुलाळ याच्या नावावर परीक्षा देण्यास बसल्याचे कबूल केले. दरम्यान कुलाळ पळून गेला असून जंगमला पोलिसांनी अटक केली आहे.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय