सांगली : मिरजेत दोघा ट्रक चोरट्याना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरजेत ट्रक चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यावेळी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

अमोल अधिक आपटे (वय २७, रा. हडपसर, पुणे), विकास कैलास वंजाळे (वय २३, रा. परिते, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक गस्त घालत होते. हवालदार अशोक डगळे यांना मिरजेत चोरीचा ट्रक घेऊन तिघे आल्याची माहिती मिळाली.

निरीक्षक पिंगळे यांच्या सूचनेनुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वैराग (बार्शी) येथून ट्रक चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक डगळे, अरुण औताडे, वैभव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You might also like