Indapur : शस्राच्या धाकाने प्रवाशांना लुटणारा फरार अट्टल गुन्हेगार अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्ग, महात्मा फुले चौक, देशपांडे व्हेज नजिक, लघुशंकेसाठी थांबलेल्या आल्टो कार मधील कुटुंबाला चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्राने मारहाण करून रोख रक्कम व दागीने लुटल्याची घटना १५ डिसेंबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील फरार सराईत व अट्टल गुन्हेगार घोष पिंटू काळे (वय १९) रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर याला जेरबंद करून इंदापूर पोलीसांच्या ताब्यात दील्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.असुन आरोपीला न्यायालयात हजर केले असता २७ मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अंकुश गोरोबा काळे रा. गोरेगाव पूर्व, मुंबई, यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दीली होती.फीर्यादी हे त्यांचे कुटुंबासह आल्टो कार गाडीतुन मुंबईहुन उस्मानाबादला निघाले होते. १५ डिसेंबर रोजी पहाटे गाडी इंदापूर बाह्यवळण देशपांडे व्हेजजवळ लघुशंकेसाठी थांबवली असता चार अनोळखी इसमांनी फीर्यादी यांना धारदार शस्राने मारहाण करून खीशातील २० हजार रोख, मनगटी घड्याळ,व आईचे गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मणीमंगळसुत्र कानातील सोन्याची ७ ग्रॅम वजनाची फुले,तीन एटीएम कार्ड व, एक क्रेडीट कार्डसह ४६ हजार रूपये किमतीचा ऐवज लुटुन फरार झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम सुरू असताना सदर गुन्हयातील आरोपी हा राक्षसवाडी येथे येणार असल्याची बातमी खबऱ्याकडून मिळाली होती.पोलीसांनी तेथे वेषांतर करून सापळा लावला व आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीस पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले असुन सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथकाने केली.