पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १३ जानेवारी २०१९ रोजी निलेश वाडकर याचा कोयत्याने आणि गोळी झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुख्यात सुनिल उर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे याला पुणे गुन्हे शाखेच्या युनिटनी संयुक्त कारवाई करून अटक केली. ही कारवाई कोल्हापूर येते करण्यात आली.

घटनेच्या दिवशी निलेश वाडकर हा आपल्या साथीदारांसोबत कांदेआळीकडे जात होता. त्यावेळी आरोपी डोकेफोडे याने कट रचून निलेश वाडकरचा खून केला. निलेश वाडकर सोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आणि हप्ते वसुलीस निलेश विरोध करत असल्याच्या रागातून डोकेफोडेने साथीदारांच्या मदतीने खून केला. खून केल्यानंतर तो पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता.

कुख्यात गुन्हेगार डोकेफोडे याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट १, २ व ३ ची पथके त्याच्या मागावर होती. डोकेफोडे हा गोवा येथे आपल्या पत्नी आणि इतर साथीदारांसह राहत असून तो लवकरच जागा बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेस मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची पथके गोवा येथे रवाना करण्यात आली. मात्र पथकाला तो खासगी बसने मुंबईच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला कोल्हापूर येथे ताब्यात घेण्यात आले. आरोपी डोकेफोडे याच्यावर दत्तवाडी, भारती विद्यापीठ, हवेली, वारजे पोलीस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समिर शेख, भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी अशोक शेलार, गणेश साळुंखे, सचिन ढवळे, राकेश खुणवे, दत्ता फुलसुंदर, अतुल साठे संदिप राठोड, संदिप तळेकर, सचिन जाधव, इम्रान शेख यांच्या पथकाने केली.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय