कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या १६ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ग्रामीण भागात कोंबड्याची झुंज लावली जात असल्याचे आपणास माहित आहे. आपण त्याचे व्हिडिओ देखील नेहमी पाहतो. पण, पुणे जिल्यातील मुळशी तालुक्यातील भुगाव येथील मुकाईवाडीत निसर्ग लॉज येथे कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याचे समोर आले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) त्यावर छापा टाकून तब्बल १६ जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, साधने व तब्बल १ लाख ५ हजार ६९० रुपये जप्त करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B01N9CEO0I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0d2aa03-a1cb-11e8-b41e-47676732b151′]

भुगाव येथील मुकाईवाडीत निसर्ग लॉज येथे रात्रीच्या वेळी कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर मोठया प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मुकाईवाडी येथील निसर्ग लॉजवर गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता तेथे ८ ते १० कोंबडे होते. या सर्व कोंबड्यांना प्रशिक्षित केले होते. त्यांच्या पायाच्या पंजाला ब्लेड बांधले जाते. मग त्यांची झुंज लावली जाते. त्यांच्यापैकी कोणता कोंबडा जिंकेल असे वाटते त्यावर खेळी पैसे लावतात. कोंबडे हे हवेत उडी मारुन दुसऱ्या कोंबड्यावर पंजा मारतात. पंजाला ब्लेड लावलेले असल्याने त्यात कोंबडे जखमी होतात आणि ज्या कोंबड्याला ब्लेड लागते तो कोंबडा हरतो.

राजेश रई, अरुण सरोदे, प्रकाश पुजारी, विश्वनाथ शेट्टी, गंगाधर कोरायन, हरीश पुजारी, नारायण पवार, सुरंदर हेगडे, संदीप शेट्टी, वासू खरकेरा, रविंदर सिंग, मकरंद घाडगे, सायन छत्री, कुबेर अधिकारी, बाळकृष्ण इलतवारी, दयानंद पुजारी हे त्यांचे साथीदार प्रसन्ना शेट्टी, अण्णा यांनी मिळून ही कोंबड्याची झुंज लावली होती. त्यांनी कोंबड्यांना निदर्यतेने वागून त्यांचे झुंजीवर पैसे लावून जुगार खेळल्याबदद्ल पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. निसर्ग लॉजचे चालक प्रसन्न शेट्टी  व त्यांचा मॅनेजर गंगाधर कोरायन या दोघांनी लॉजवर विना परवाना विदेशी दारुच्या ४१ बाटल्या बाळगल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like