गावठी पिस्तूल बाळगणारे सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अझहर चाँद शेख (२१, वारजे माळवाडी) व सागर नरेंद्र आर्या (२०, वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी शहरात गस्त घालत असताना अझर शेख हा त्याच्या साथीदारासह गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन मालधक्का चौकात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदारा संजय काळोखे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावेळी त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे प्रत्येकी एक पिस्तूल व एक जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ती जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अझजहर चाँद शेख याच्यावर मारामारीचा गुन्हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.

ही कामगिरी प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त ज्योती प्रिया सिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहूल घुगे, कर्मचारी संजय काळोखे, भाऊसाहेब कोंढरे, रमेश गरुड, प्रमोद मगर, प्रकाश मगर, महेश कदम, मनोज शिंदे, सुनील चिखले, धिरज भोर, विजय गुरव, संतोष मते, हनुमंत गायकवाड, पांडूरंग वांजळे, उदय काळभोर, फिरोज बागवान, शिवानंद बोले, मंगेश पवार, प्रविण पडवळ, अमोल पिलाने, हनुमंत बनकर, प्रदिप शिंदे व एकनाथ कंधारे यांच्या पथकाने केली.