Pune News : रिअल इस्टेट व्यावसायिकाकडून 20 लाखांची खंडणी स्विकारणारा गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोंढवा परिसरात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाकडून  घेताना आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (पूर्व) सापळा रचून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) कोंढवा येथील रिएल इस्टेटच्या ऑफिसमध्ये करण्यात आली. सागर दत्तात्रय फडतरे (वय-29), गणेश दत्तात्रय फडतरे (वय-29 दोघे रा. बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कोंढवा परिसरात जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुमची 50 लाख रुपयाची सुपारी मिळाली असून जीव वाचवायचा असेल तर 20 लाख रुपये द्या. अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. खंडणी मागणारा आरोपी फिर्यादी यांच्या कार्यालयात 20 लाख रुपये घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सागर फडतरे याला खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथिदार गणेश फडतरे याचे नाव सांगितले. पोलिसांनी गणेशला अटक केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार विनोद साळूंके, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे व प्रविण पडवळ यांच्या पथकाने केली.