माथाडीच्या नावाखाली धमकावून खंडणी मागणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कंपनीमध्ये माथाडी कंत्राटची मागणी करुन कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी प्रोजेक्ट मॅनेजरकेड २५ हजारांची मागणी करुन बांधकाम साईटवरील वाहनांना साईटवर जाण्यास मज्जाव केला. हा प्रकार आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास केशवनगर येथील ऑक्सफर्ड ग्रुप व गोदरेज कंपनीच्या बांधकाम साईटवर घडला.
[amazon_link asins=’B00L8PEEAI,B07DD9X8Q2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c3b7956-b1f3-11e8-9635-db153c8823c0′]

बंटी राजू शेळके (रा. हडपसर रेल्वे स्टेशन, मुंढवा), शेखर भागुराम पिसाळ (रा. भीमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राहुल जाधव (रा. मुंढवा) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय लक्ष्मण जाधव (वय-३५ रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय जाधव हे मिलेनियम इंजिनिअरींग अॅड कॉन्ट्रॅक्टर प्रा.ली. या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीने केशवनगर येथे ऑक्सफर्ड ग्रुप व गोदरेज कंपनी यांच्यामध्ये सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पाचे काम घेतले आहे. बांधकाम साईटवर बांधकामासाठी लागणारे साहित्याची वाहनांमधून नेण-आण केरण्यात येते. तसेच साहित्य उतरवू घेणे आणि वाहनांमध्ये भरणे याचेदेखील काम या ठिकाणी केले जाते.
[amazon_link asins=’B01M8LZPU1,B0744L38KK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45803755-b1f3-11e8-8ecb-4bf471df7675′]

वाहनांमधून आलेले सामान उतरवण्यासाठी आणि भरण्यासाठीचे माथाडी काम गणपत कारंडे याच्या विक्रांत एन्टरप्रायजेसला देण्यात आले होते. मात्र, त्यांचे काम समाधानकारक नसल्याने त्यांचे कंत्राट काढून घेऊन ते हमाल विकास संस्थेला देण्यात आले होते. आज सकाळी बंधकाम साईटवर बांधकामाचे साहित्य घेऊन आलेल्या ट्रकला राहुल जाधव याच्या सांगण्यावरुन आरोपींनी आडवले. आरोपींनी बांधकाम साईटवरील गेटमधून आतील वाहनांना बाहेर जाण्यास मज्जाव करत बांधकामाचे साहित्य घेऊन आलेल्या ट्रकला आत जाऊ दिले नाही. तसेच विजय जाधव यांना आम्हाला माथाडी कंत्राट द्या नाहीतर २५ हजार रुपये द्या अशी मागणी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राजेंद्र घाटगे करीत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी