अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन बिबवेवाडी येथील १४ वर्षाच्या मुलाला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन तिच्या वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1fa72c63-a43d-11e8-ad9b-51d726db1329′]

संदीप आनंदराव देवताळे (वय ४०, रा. बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी हा प्रकार आरोपीच्या घरी घडला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संदीप देवताळे याच्या घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले. तिच्यावर अत्याचार केले. तू हे कोणाला काही सांगू नको नाहीतर तुझ्या बापाला मारुन टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने या पिडित मुलीला संपर्क करण्यासाठी स्वत:कडील मोबाईल सीमकार्डसह दिले. व तू माझ्याशी फोनवर बोलली पाहिजे, अशी धमकी दिली. व १०० रुपये दिले. या प्रकारानंतर त्याने या मुलीला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी संदीप देवताळे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सुतार अधिक तपास करीत आहेत.