हयात हॉटेलमध्ये तोडफोड प्रकरणात शिवसेना गटनेत्याच्या भावाला अटक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान हयात हॉलमध्ये घुसून तोडफोड करण्यात आली होती. तपासात हयात हॉटेलच्या आवारात मिळालेल्या सीसीटी फुटेजवरून गुन्ह्यातील १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्व शिवसैनिक असून आरोपीमध्ये शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या भावाचा समावेश आहे. आरोपींना सोमवारपर्य़ंत (दि.१३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c41e2370-9d89-11e8-9d0a-5115d3b0ec47′]

अटक केलेल्या आरोपींमध्ये शिवसेनेचे पुणे महापालिकेचे नगरसेवक व गटनेते संजय भोसले यांचा भाऊ चंद्रकांत भोसले यांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी भास्कर रामराव भोसले (वय५१रा. रामनगर येरवडा), आशिष यशवंत शिर्के (वय २१रा.नागपूर चाळ येरवडा),चंद्रकांत शशिकांत भोसले (वय४८, रामनगर येरवडा ),शशिकांत चंद्रकांत बाराते (वय २४रा.लक्ष्मीनगर येरवडा ),सचिन दिनकर भोसले (वय ४७ रा.रामनगर येरवडा),दिलीपसिंह अष्टभुजा ठाकूर (वय २७ रा.रामनगर येरवडा),प्रमोद रविकांत जाधव (वय २८रा.रामनगर येरवडा),प्रशांत कृष्णा मोरे (वय३२ रा. रामनगर येरवडा),किशोर यशवंत काटकर (वय ५०,रा.बी.टी.कवडे रोड घोरपडी), यशवंत उर्फ सुनील भानुदास मोरे (वय५०, रा. रामनगर येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे .

महाराष्ट्र बंदचे दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथील हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ शिवसैनिकांनी ८ ते ९ दुचाकीवरून येऊन  बेकायदेशीरपणे जमावाने हॉटेलच्या आवारात घुसून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील मोबाइल फोडून हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरून अंदाजे २० ते २५ शिवसैनिकांविरुद्ध येरवडा पोलिसांनी विविध गंभीर गुन्हे दाखल केले होते.

याप्रकरणी अधिक तपासात हयात हॉटेलच्या आवारात मिळालेल्या सीसीटी फुटेजवरून गुन्ह्यातील १० आरोपींना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास रामनगर येथे अटक केली. अटक आरोपींना सोमवारपर्य़ंत (दि.१३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8b7a911-9d89-11e8-9311-c19b65d07b8d’]

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,उप निरीक्षक रवींद्र गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळसाहेब बहिरट, पोलीस हवालदार  हनुमंत जाधव, हरिश्चंद्र मोरे, पोलीस नाईक किशोर सांगळे ,अशोक गवळी यांच्या पथकाने केली. या गंभीर गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे करत आहेत .