उरूळी कांचनमध्ये गावठी पिस्तुलासह एकाला अटक, LCBची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- लोणी काळभोर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून एका इसमाकडून एक गावठी पिस्तुल व एक जीवंत काडतूस हस्तगत केले असून पुढील तपासासाठी त्यास लोणी काळभोर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

उरुळी कांचन गावात एक इसम गावठी कट्टा घेऊन येत असल्याचे एका बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यावर पोलिस अधिक्षक संदीप पाटील व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक उरुळी कांचन येथे पोहोचली त्यानंतर मिळालेल्या माहितीचा इसम एका स्कूटरवरून आल्याचे दिसले.त्यावर त्याची झडती घेतली असता स्कुटरच्या डिकीमध्ये एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस मिळून आले. स्कुटरसह एकुण 60100 रुपयाचा माल जप्त केला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव मंगेश किसन चौधरी (चक्रधर हाईट्स डाळींबरोड उरुळी कांचन)असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण चे दत्तात्रय गुंड (सहाय्यक पोलिस निरीक्षक), दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिमण, सचिन गायकवाड, चंद्रकांत जाधव, धीरज जाधव, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, लिमाकतअली मुजावर विजय कांचन यांनी सहभाग घेतला.

You might also like