अटक केलेल्या महिलेनं डॉक्टरांच्या सर्जिकल ब्लेडनं करुन घेतले गळ्यावर वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले असताना तिने टेबलवर ठेवलेले डॉक्टरांचे सर्जिकल ब्लेड घेऊन स्वत:च्या गळ्यावर मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीतील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजता घडली. रोझी अ‍ॅलन रॉड्रक्स ऊर्फ रोझी फर्नाडिस (वय ३४, रा. कासारवाडी) असे या महिलेचे नाव आहे.

रोझी रॉड्रक्स हिला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना तिला चक्कर आल्याने उपचारासाठी वाय सी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्याकडील टेबलावर सर्जिकल ब्लेड ठेवले होते. ते घेऊन रोझी हिने स्वत:चा गळ्यावर मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथेच तिच्यावर उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मनिषा जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

कासारवाडी येथील जागा खाली करुन घेण्यासाठी रोझी, जॉन फर्नाडिस, मायकल डॉमनिक फर्नाडिस व इतरांनी १६ सप्टेबरला सायंकाळी आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली होती. त्यावेळी जॉन फर्नाडिस याने तलवारीने अम्रितसिंग गिल या व्यावसायिकावर वार केले होते. इतरांनी दगड, विटा यांनी मारहाण करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणात रोझी हिला भोसरी पोलिसांनी अटक केली होती.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like