उद्धटपणा आला अंगाशी ! रानू मंडल पुन्हा जगतेय गरीबीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम –    अतिशय कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवलेल्या प्रत्येकाला ती लोकप्रियता टिकवता येतेच असे नाही. तेच काहीसे झाले आहे रानू मंडल ( Ranu Mandal) सोबत. ती इंटरनेट सेन्सेशन ( Internet Sensation) या नावाने ओळखले जात होती. एकदा एका व्यक्तीने रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) शेअर केला होता. यामध्ये ती लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांचे गाणे एक प्यार का नगमा गाताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाल्यानंतर रानू मंडलची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत होऊ लागली होती. इतकेच नाही तर गायक हिमेश रेशमियाने( Himesh Reshmiya ) रानूला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी होती. मात्र आता पुन्हा एकदा रानू मंडल अज्ञातवासात गेली असून साधारण जीवन जगत आहे.

यासाठी तिला तिचा अहंकार नडला असून कमी कालावधीत मिळालेली लोकप्रियता तिला पचवता आली नाही. रानूला कित्येक वेळा चाहते व मीडियासोबत गैरवर्तणूक करताना पाहिले होते. बॉलिवूडमध्ये रानू मंडलला पहिला ब्रेक दिलेल्या संगीतकार हिमेश रेशमियासोबत भांडणे केल्याचे वृत्त समोर आले होते. पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती महिला चाहतीसोबत वाईट वर्तणूक करताना दिसली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, ती इतक्या प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली होती कि, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं या सर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे. त्याचबरोबर सध्या तिच्याकडे कोणतेही काम नसून ती पुन्हा तिच्या जुन्या घरात राहत आहे.

You might also like