खळबळजनक ! 37 वर्षीय प्रसिध्द दिग्दर्शकाची हत्या, मृतदेह बेडशीटमध्ये बांधून खाडीत फेकला, बॉलिवूडला ‘धक्का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क्रिशनेनंदू हे ३७ वर्षांचे होते. क्रिशनेनंदू चौधरी यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारच्या खणीवडे खाडीत सापडला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी यावर कारवाई करत मुख्य आरोपीला अटकही केली आहे.

क्रिशनेनंदू चौधरी यांची हत्या मोहम्मद फुरकान या व्यक्तीने केली आहे. त्याचे वय ३८ वर्षे असून तो मालाडचा राहणारा आहे. तर क्रिशनेनंदू चौधरी हे मुंबईतील गोरेगाव भागात राहत होते. ते बॉलिवुडमध्ये फिल्म स्टुडिओमधील सेटचे डिझाईन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. क्रिशनेंदू चौधरी हे चित्रपट, मालिका, व्हीआयपी लग्न सोहळे यांच्या सेटचे डिझाईन तयार करून आरोपी मोहम्मद फुरकान याला देत होते. मोहम्मद फुरकान हा सेट उभारण्याचे काम करायचा.

दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरु होते. क्रिशनेनंदू यांचे फुकरानकडे ८५ हजार रुपये अडकलेले होते. ७ ऑगस्टला दोघे भेटले होते. तेव्हा त्यांचे वाद विकोपाला गेले होते. आरोपी फुकरान यांने त्याच्या दोन साथीदारांसह क्रिशनेनंदू यांना मालाड पश्चिमेकडील आर्यलँड भागात नेले. तिथे त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्यांनी ठार मारले. नंतर त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधून रात्री उशिरा एका कारमध्ये टाकून तो विरार खणीवडे येथील खाडीत फेकून दिला होता.

मागच्या बुधवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते बेपत्ता होते. त्यांच्या एका रुममेटने मालाड येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र शुक्रवारी म्हणजे ९ ऑगस्टला विरारमधील खाडीत त्यांच्या मृतदेह सापडला. तसंच हा मृतदेह एका चादरीत गुंडाळलेला होता. या प्रकरणी तपासासाठी पोलिसांनी ३ स्वतंत्र पथके तयार केली असून मोहम्मद फुरकानयाचा ताब्यात घेतले असून त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध अद्याप सुरुच आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like