Art Director Rajesh Sapte Suicide Case | राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी राकेश मौर्याला अटक, वाकड पोलिसांची कारवाई

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मराठी कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Art Director Raju Sapte Suicide Case) यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ (Video) शेअर करित गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला असून बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे आणि नरेश मिस्त्री यांना वाकड पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात (Art Director Raju Sapte Suicide Case) आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी साप्ते यांना धमकावणाऱ्या राकेश मौर्याला अटक केली आहे. मौर्याला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल कीज समोरून गुरुवारी (दि.15) अटक केली. Art Director Rajesh Sapte Suicide Case | Rakesh Maurya arrested in Rajesh Sapte suicide case, Wakad police action

राकेश सत्यनारायण मौर्य (वय-47 रा. कांदिवली ईस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
यापूर्वी चंदन रामकृष्ण ठाकरे (वय-36 रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई), नरेश मिस्त्री यांना अटक करण्यात आली आहे. तर गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई) आणि अशोक दुबे हे फरार आहेत.
याप्रकरणी सोनाली राजेश साप्ते (वय-45 रा. ताथवडे सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रसिद्ध मराठी कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Marathi Art Director Raju Sapte Suicide) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं असा आरोप करण्यात आला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी राजेश साप्ते यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला (Rajesh Sapte shared a video on social media) होता.
यामध्ये त्यांनी नरेश मिस्त्रीचं (Naresh Mistry) नाव घेतलं होतं.
तो बऱ्याच काळापासून धमक्या (Threat) देत होता असा आरोप राजेश यांनी केला.
व्हिडिओमध्ये नरेश याचे नाव असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

राजेश साप्ते यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .
राजेश साप्ते यांनी एक सुसाईड नोट (Suicide Note) आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
त्यातून त्यांना काही जणांनी त्रास दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींवर कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. याशिवाय व्यावसायिक नुकसान करण्याची देखील धमकी देण्यात आली होती.
राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये द्यावे लागले होते.
असं सोनाली साप्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलिसांनी नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे यांच्यावर गुन्हा (Fir) दाखल केला आहे. याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर (senior police inspector vivek muglikar आणि त्यांचे सहकारी प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Art Director Rajesh Sapte Suicide Case | Rakesh Maurya arrested in Rajesh Sapte suicide case, Wakad police action

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात बँक मॅनेजरच्या मदतीने घातला बँकेलाच गंडा

JEE Main 2021 Exam | जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

Pension Slip | पेंशनधारकांना मोठा दिलासा ! आता WhatsApp च्याद्वारे सुद्धा मिळू शकते पेन्शन स्लिप