शिवरीत कलाशिक्षक कार्यशाळा

जेजुरी :पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पंचायत समिती पुरंदर (शिक्षण विभाग) व पुरंदर तालुका कलाशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोम.दि.२६/८/२०१९ रोजी कलाशिक्षक कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत अभिनव कला महाविद्यालय, टिळक रोड, पुणे-३० चे प्राचार्य राहुलजी बळवंत सर यांना कलाभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

म.जोतीराव फुले विद्यालयाचे प्राचार्य शहाजी कोळेकर सर व कानिफनाथ विद्यालय, भिवरीचे मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड सर यांनाही आदर्श मुख्याध्यापक म्हणुन कलाभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने खालील शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले.

सौ.स्मिता बोराटे-श्री नारायण महाराज विद्यालय, हिवरे. श्री.विवेकराव शिंदे-डाॅ.शंकरराव कोलते माध्य विद्यालय, पिसर्वे श्री. मनोज सोनवणे-इंदु इंग्लिश स्कुल, कोळविहीरे (इंग्रजी माध्यम) सौ. मंदा कुजीर  गुरुकुल माध्य. विद्यालय, सासवड (कलाशिक्षक नसणारे पण कलाविषय मुलांच्यात रुजवणारे व शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी सातत्याने कष्ट घेऊन विद्यार्थी परीक्षेला बसविणारे) श्री. रमेश बोरावके  श्री शिवशंभो माध्य.विद्यालय, खळद याप्रसंगी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष किरण सरोदे सर यांनी शासकीय चित्रकला परीक्षा व मूल्यमापन या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत स्थिरचित्र या विषयाचे प्रात्यक्षिक शंकर काकडे (बाॅम्बे आर्ट सोसायटी अवार्डप्राप्त) व स्मरणचित्र या विषयाचे प्रात्यक्षिक रोहीत यादव (२०१९ डिप्लोमामध्ये महाराष्ट्रात ३रा) यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले. या कार्यशाळेसाठी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष कलामहर्षी हुसेन खान (चाचा), राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व पुणे जिल्हा मुख्याध्यपक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर सर, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे सचिव व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे सहसचिव मिलिंद शेलार, सल्लागार सोपानराव तावरे सर डोम्स इंडस्ट्रिजचे समन्वयक रघुनाथ पोवळे, मुख्याध्यापक पवार सर, पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास शिंदे सर, शिक्षक लोकशाही आघाडी, पुरंदरचे अध्यक्ष संजय भिंताडे सर, कार्याध्यक्ष तानाजी झेंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लोकशाही आघाडी, पुरंदरचे सचिव जालिंदर घाटे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे सर, पुरंदर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बिभिषण देडे सर व सचिव योगेश घोरपडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन तालुका कार्यकारीणीच्या सर्व सन्मानीय पदाधिकार्‍यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –