‘या’ 5 कारणांमुळं कमी वयात ‘सांधेदुखी’ अन् ‘हाडं’ खराब होतात, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात अनेक लोक सांधेदुखीनं त्रस्त आहेत. याचा जास्त परिणाम हा गुडघे आणि मणक्यावर होतो. हाताची बोटं, मनगटं तसंच पाय अशा सांध्यांवरही याचा परिणाम दिसून येतो. आज आपण गुडघेदुखीसाठी कारणीभूत काही पदार्थ जाणून घेणार आहोत जे आहारात वगळून आपण आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

1) ग्लुटेन फूड – गव्हात ग्लायडीन नावाचंही एक प्रोटीन असंत ज्यामुळं शरीराला नुकसान पोहचू शकतं. इन्फेमेशनची समस्या वाढू नये यासाठी डॉक्टर रहे्युमेटॉईड आर्थरायटीसपासून बचाव करण्यासाठी ग्लुटेन फ्री पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा असा सल्ला देतात.

2) रेड मीट – काही अभ्यासातून असा दावा करण्यात आला आहे की, रेड मीट इन्फेमेशनचं कारण ठरू शकतं. यामुळं आर्थरायटीसची लक्षणं अधिक तीव्रतेनं जाणवू शकतात. 25630 लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दावा करण्यात आला आहे होता की, रेड मीटचं जास्त सेवन केलं तर आर्थरायटीसचा धोका वाढतो.

3) साखर – आर्थरायटीसच्या रुग्णांनी साखरेचं सेवन योग्य प्रमाणात करायला हवं. कँडी, सोडा, आईसक्रीम किंवा सॉस सारख्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. 217 लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार साखरयुक्त पदार्थांमुळं आर्थरायटीसचा धोका वाढतो.

4) मीठ – तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारात मीठाचं प्रमाण जास्त असेल तर ते गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. म्हणून पॅक फूड, सूप, पिझ्झा, प्रोसेस्ड मीट या पदार्थांचं सेवन योग्य प्रमाणात असायला हवं. उंदरांवर 65 दिवसांपर्यंत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार संतुलित प्रमाणात मीठ घेतल्यानं आर्थरायटीसच धोका कमी होतो.

5) अल्कोहोल – इंफ्लेमेटरी आर्थरायटीसचा सामना करत असलेल्या लोकांनी अल्कोहोलचं सेवन पूर्ण पणे बंद करायला हवं. स्पॉडीलो आर्थरायटीसनं पीडित असलेल्या 278 लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार इंफ्लेमेटरी आर्थरायटीस स्पायनल कॉड आणि सॅकोयलियकवर वाईट परिणाम करतो. अल्कोहोलचं अतिसेवन स्पाईनल रचनेला बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.