कलम ३७० ! पाकिस्तानात तीव्र ‘पडसाद’ तर इस्लामाबादमध्ये महा’भारत’ (व्हिडीओ)

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – सध्या देशात कलम ३७० हटवल्याने कुठे आनंद व्यक्त केला जातोय, तर कुठे नाराजी व्यक्त होत आहे. तसंच पाकिस्तानमधेही या निर्णयाचे पडसाद दिसून येत आहेत. राज्यसभेत जेव्हा कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केले होते. त्यानंतर आता मात्र संजय राऊत यांचे फोटे इस्लामाबाद येथील पोस्टर्सवर झळकत आहे.

राज्यसभेतील भाषणात आज जम्मू काश्मीर घेतलं आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, अशी गर्जना संजय राऊतांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर थेट इस्लामाबादमध्ये पोस्टर्स झळकले आहेत.

या पोस्ट्रर्सवर महाभारत – स्टेप फॉरवर्ड अशी हेडलाईन देण्यात आली आहे. तसंच यावर त्यांचे नाव आहे. तसंच एएनआय या वृत्तसंस्थेने केलेलं ट्वीट या पोस्टरवर आहे. तसंच संजय राऊत यांनी काय वक्तव्य केले हे यावर लिहीलेलं आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

हे लावलेले पोस्टर दाखवणारे एक व्हीडिओ एका पाकिस्तानी तरूणाने पोस्ट केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मला कळत नाही, आपला देश कुठे चालला आहे. आपल्याच देशात राजधानीच्या शहरात आपल्या डोळ्यादेखत आपल्याच विरोधात हे हिंदुस्थानी पोस्टर्स लावत आहेत. आपण झोपलो आहोत. एक दोन नव्हे तर माझी नजर जाईल तिथपर्यंत ही पोस्टर्स लावली आहेत. म्हणजे आपण या देशात फक्त राहतो आहोत. आपलं काही कर्तव्य नाही का?, आपल्यालाही काही करायला पाहिजे, असं या तरूणाने म्हटलं आहे.

दरम्यान, भारत सरकारने घेतलेल्या या निर्णयाने पाकिस्तानला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. तसंच पाकिस्तान व्याप्त काश्मिरही भारताचाच हिस्सा आहे, असं म्हटल्याने पाकिस्तान आता चिंतेत गेल्याचे स्पष्ट होत आहे. तर पाकिस्तानी फौज काश्मिरी जनतेसाठी काहीही करण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तान सेना प्रमुख आसिफ गफूर यांनी केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –