कलम 370 आणि CAA चा निर्णय मागे घेणार नाही : PM नरेंद्र मोदी

वाराणसी : वृत्तसंस्था – देशात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी म्हणजे कलम ३७० आणि त्यानंतर सीएएविरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून सरकार आपला निर्णय मागे घेणार नाही, असं मोदींनी ठामपणे सांगितलं आहे. कलम 370 आणि सीसीए हे आवश्यक होतं. यामुळे हे निर्णय कायम राहतील, अशी ग्वाही मोदींनी वाराणसीतील जाहीर सभेत दिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलम ३७० आणि सीएए या कायद्यांविरोधात विरोधकांनी देशभरात रान पेटवले परंतु सरकारने आपला निर्णय बदलला नाही. महाकालच्या आशीर्वादाने घेतलेले हे निर्णय यापुढेही कायम राहतील अशी ग्वाही देतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सरकार या भूमिकेवर ठाम असून मागे हटणार नाही, अशीच भूमिका मांडली आहे.

दरम्यान दिल्लीत शाहीनबागेत अजून सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांचे जोरदार धरणे आंदोलनं सुरूच आहेत. तसेच संपूर्ण देशभर या कायद्यांविरोधात मोर्चे आणि आंदोलनं करून सरकारवर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. तसेच ज्या राज्यांत भाजपाचे सरकार नाही अशा अनेक राज्यांनी सीएए लागू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. पण वाराणसीतील जाहीर सभेत सरकारची भूमिका स्पष्ट करून पंतप्रधान मोदींनी आंदोलकांना इशारा दिला की हे कायदे लागू झाल्याशिवाय राहणार नाहीत.

You might also like