कलम 370 ! इंदापूरात भाजप कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मु-काश्मीर राज्याचे दोन भागामध्ये विभाजन करणारे ऐतिहासिक जम्मु-काश्मिर पुनर्रचना विधेयकातील ३७० व ३५ अ हटवाण्याचा प्रस्ताव केंद्रिय गृृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मंजुरीसाठी मांडला. राज्यसभेची मंजुरी घेवुन लोकसभेतही हे विधेयक मंजुर करण्यात आले. कलम ३७० व ३५ अ रद्द करण्यात आल्याच्या प्रित्यर्थ इंदापूर शहरातील भाजपा नेते व नगरपरिषद माजी विरोधी पक्षनेते पांडूरंग हरिभाऊ शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ.नलिनी पांडूरंग शिंदे, यांचेसह आनेक कार्यकर्त्यांनी शहरातील नागरिकांना लाडू वाटप करून इंदापूर शहरात आनंदोत्सव साजरा केला.

तर अंथुर्णे येथिल भाजपाचे (जिल्हा परिषद व पंचायत समिती आघाडी ) प्रदेश सरचिटनीस युवराज मस्के संतोष कांबळे यांचेसह आनेक कार्यकर्त्यांनी अंथुर्णे व जंक्शन गावातील नागरीकांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी बोलताना पांडूरंग शिंदे म्हणाले की सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसला जे जमले नाही ते नरेंद्र मोदी व अमित शहा सरकारने पाच वर्षात करून दाखविले. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी कीतीही मोकळे अवसान आणुन वल्गना केल्या तरी महाराष्ट्रातील भाजप युतीची सत्ता पुढील पंधरा वर्षापर्यंत अबाधीत राहील. यावेळी यावेळी हाजी इकबाल सय्यद, आदीत्य बोराटे, भाजपाचे जयवंत बानकर, अमोल राजगुरू, कुणाल तौर, आशितोष शिंदे, दिगांबर राऊत, पांडूरंग राऊत, रूपाली शिंदे, सारीका चव्हाण, गजराबाई शिंदे, अणूसया शांदे यांचेसह अनेक महिला उपस्थित होत्या.

आरोग्यविषयक वृत्त