‘इथं’ काश्मीरींना जेवणासाठी खास ‘कलम 370’ थाळी, मिळणार ‘बंपर 370’ रूपयाचा ‘डिस्काऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर देशभरात त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. अनेकांनी हा धाडसी निर्णय असल्याचे म्हटले तर अनेकांनी याला हुकूमशाही म्हटले. मात्र दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये एका रेस्टोरंटने या कलम 370 चा अतिशय खुबीने वापर करत त्याच्या नावाने नावाने नवीन थाळी सुरु केली आहे. या थाळीत फक्त काश्मिरी पदार्थ असून यामध्ये काश्मिरी नागरिकांना 370 रुपयांची सूट दिली जाणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला केवळ काश्मीरचे नागरिक असून उपयोग नाही तर तुम्हाला सरकारी ओळखपत्र देखील दाखवावे लागणार आहे.

व्हेज आणि नॉनव्हेज आहे खास
या रेस्टोरंटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही पदार्थांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही याठिकाणी दोन्ही प्रकारच्या पदार्थांचा लाभ घेऊ शकता. या थाळीमध्ये काश्मिरी पुलाव, खमीर रोटी, नदरूची शामी, दम आलू यांसारखे पदार्थ आहेत. या थाळीची किंमत 2370 रुपये ठेवण्यात आली आहे. तर नॉनव्हेज थाळीमध्ये काश्मिरी पुलाव, खमीर रोटी, नदरूची शामी, रोगन जोश यांसारखे पदार्थ देण्यात येणार असून याची किंमत 2699 रुपये ठेवण्यात आली आहे.

मोदींची 56 इंच थाळी आणि बाहुबली थाळी
कनॉट प्‍लेसमधील हे रेस्टोरंन्ट आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रकार आणि थाळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी विविध नावाच्या थाळ्या याआधी देखील बनविण्यात आल्या आहेत. याआधी देखील मोदींची 56 इंच थाळी आणि बाहुबली थाळी याठिकाणी बनविण्यात आली आहे.

 

Loading...
You might also like