कलम ३७० : जम्मू-काश्मीरमध्ये उद्यापासून सरकारी कार्यालये आणि शाळा सुरू

श्रीनगर : वृत्तसंस्था – कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये विशेषत: खोऱ्यात अजूनही तणाव कायम आहे. मोदी सरकारच्या निर्णयापासून खबरदारीचा उपाय म्हणून या भागात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांनी सरकारी कर्मचार्‍यांना तातडीने कामावर परत येण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय उद्या (दिनांक ९) पासून सांबा जिल्ह्यातील शाळा सुरू होतील. इतर जिल्ह्यांमध्ये बकरी ईद संपल्यानंतर शाळा चालू होणे अपेक्षित आहे.

गुरुवारी जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिवांनी एका आदेशात सांगितले की, “श्रीनगरमधील विभागीय स्तरीय, जिल्हास्तरीय आणि नागरी सचिवालयात काम करणारे सर्व कर्मचारी त्वरित कामावर परत यावेत.” यासह, कर्तव्यावर असणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची सुरक्षा आणि कामासाठी शांततेचे वातावरण सुनिश्चित करावे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त