‘या’ नव्या प्लॅननुसार भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘दणका’ देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली आहे. त्यामुळेच पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानच्या या हालचालींना भारतही आता चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्र संघात तक्रार करू, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.

इम्रान खान आणि त्यांच्या नापाक मनसुब्यांना प्रतिऊत्तर देण्यासाठी भारतानेही रणनीती आखली आहे. याप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्र संघाच्या पाच स्थायी आणि 10 अस्थायी सदस्यांसोबत सध्या चर्चा करत आहे. भारताने जम्मू काश्मिरातील कलम 370 का हटवलं, याबाबात त्यांना माहिती दिली जात आहे. या निर्णयाचे जम्मू काश्मिरातील लोकांना नेमके काय आर्थिक फायदे होतील, हे या चर्चेद्वारे समजावून सांगितलं जात आहे. तसंच जम्मू काश्मिरात पाकिस्तान वारंवार करत असलेल्या कुरापतींकडे संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांचं लक्ष वेधण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत. अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आणि त्याचा मोठा फटका पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीला भोगावा लागत आहे. भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने सगळ्यात आधी मलेशिया आणि तुर्की या देशांकडे मदत मागितली. UAE ने थेट भारताची बाजू घेतली आहे, यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –